WhatsApp

चौंडेश्वरी नगर ब्लॉक एरिया, कुंडल ता. पलुस, जि. सांगली 416 309

स्थापना उद्देश

माणुसकी फौंडेशन, महाराष्ट्र राज्य

समाजातील युवकांचे संघटन करून त्यांच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून विकासाचे पाऊल टाकण्याच्या हेतूने १९ फेब्रुवारी २०१९ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून कुंडल येथील युवकांच्या प्रेरणेतून माणुसकी फाउंडेशन कुंडल स्थापन करण्याचा उद्देश राहिला. भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्यांनी कुंडल व कुंडल परिसरातून आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यामध्ये स्वातंत्र्यसैनिक क्रांतीसिह नाना पाटील, डॉ. जी. डी. बापू लाड, कॅप्टन रामभाऊ लाड, माझे आजोबा कृष्णाजी टकले महाशय, क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी, यांच्या क्रांतिकारी विचाराचा आणि विकासाच्या प्रेरणेतून तसेच त्यांच्या समाज कार्याचा व स्वातंत्र्याचा वसा आणि वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी माणुसकी फौंडेशन कार्यरत ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. आणि २७ फेब्रुवारी २०१९ रोजी धर्मदाय आयुक्त सांगली या ठिकाणी फौंडेशन नोंदीसाठी प्रस्ताव नोंदवला गेला. सदर फौंडेशन नोंदण्यासाठी चौडेश्वरी ब्लॉक एरिया हायस्कूल रोड कुंडल येथे १२ ते १५ जन मिटिंग साठी उपस्थित राहून फौंडेशनच्या पुढील कार्याच्या आणि उपक्रमाच्या बाबतीत आढावा बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.

संस्था शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, अन्नदान, रक्तदान, सामाजिक जनजागृती आणि मानवसेवा या विविध क्षेत्रांमध्ये सातत्याने कार्य करत आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, या विश्वासातून माणुसकी फौंडेशन गरजू लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मदत, निराधार व बेघर व्यक्तींना अन्न व आवश्यक वस्तूंचे वितरण, गरजू रुग्णांना वैद्यकीय सहाय्य, रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण मोहीम, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, महिला सक्षमीकरण उपक्रम, आपत्तीग्रस्तांना मदतकार्य तसेच विविध सामाजिक उपक्रमांद्वारे संस्था समाजसेवेचे कार्य करत आहे.

पर्यावरण संरक्षण हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे या भावनेतून संस्था नियमित वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण जनजागृती कार्यक्रम आयोजित करते. तसेच रक्तदान हेच जीवनदान या संदेशासह रक्तदान शिबिरे आयोजित करून अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळवून देण्यासाठी योगदान देते.
माणुसकी फौंडेशनचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत मदत पोहोचवणे, मानवतेचे मूल्य जपणे आणि एक सशक्त, संवेदनशील व समतोल समाज घडविणे. संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य, स्वयंसेवक आणि समाजहितैषी नागरिक यांच्या सहकार्यामुळे हे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे जात आहे.

  • आमचे ध्येय :

    मानवतेच्या भावनेतून समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत मदत पोहोचवणे, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकासाच्या माध्यमातून सर्वसमावेशक व सक्षम समाज निर्माण करणे.

  • आमची दृष्टी :

    प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याची संधी मिळावी, कोणीही उपाशी राहू नये, गरजू रुग्णांना वेळेवर मदत मिळावी आणि सामाजिक एकात्मता व मानवता यांचे मूल्य जपणारा आदर्श समाज निर्माण व्हावा.

  • 00

    +

    लाभार्थी नागरिक

  • 00

    +

    सामाजिक उपक्रम

  • 00

    +

    रक्तदान शिबिरे

  • 00

    +

    वृक्षारोपण

आमचे उपक्रम

माणुसकीची ज्योत पेटवत, सेवेतून समाज घडवत

आमचे पदाधिकारी

माणुसकी फौंडेशनचे नेतृत्व

लोकांच्या भावना

माणुसकी फौंडेशन सोबतचा विश्वास आणि अनुभव

माणुसकी फौंडेशनच्या विविध सामाजिक उपक्रमांमुळे अनेक गरजू व्यक्तींना आधार, मदत आणि नवसंजीवनी मिळाली आहे. लाभार्थी, स्वयंसेवक आणि नागरिकांनी व्यक्त केलेले काही अनुभव.

Together We Can Make a Difference

Join Manuski Foundation in spreading hope, compassion, and support to those who need it most.

Go Back Top